Wednesday, January 28, 2009

आठवणींचे कप्पे

आठवणींचे कप्पे कोड्यांसारखे असतात
कधीतरी उघडतात, कधीतरी अडकतात

कुठून मागे वळलो हेच विसरून जातो
कप्प्यातून जाता जाता जुन्यात हरवून जातो

क्षण एखादाच म्हणावा की क्षणांचेच चित्र जरतारी
लाटांवर मन माझे, मी उभी एकटी किनारी

भेटले मी कितीक जणांना, स्पर्शले कितीक रंगांना
आता स्पर्शूनी जाती आठवणी माझ्या सर्वांगांना

मागे वळून पाहण्याची सवयच मज पुढे नेते
एकएक आठवण माझी मी कवेत घेऊन जाते

-निर्मिती

I am pleased to have honor of posting this poem composed by a friend. She did it when we were chatting over the topic of my previous blog post 'Precious Memories Shining Bright...'. I was stunned by her spontaneous witting skills and more by the fact that my blog post made her to write it.

3 comments:

vinay said...

really ! lovely poem ! kudos !

Suneel Madhekar said...

Brilliant verse! Hats off!!

Pushkaraj said...

sahiichhh ahe..!